E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कल्याणीनगर मेट्रो स्थानकापर्यंत पीएमपी पूरक सेवेला सुरूवात
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर
पुणे : हडपसर गाडीतळ-मगरपट्टा ते कल्याणीनगर मेट्रो स्थानकापर्यंत पूरक सेवा (फीडर) पीएमपी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे हडपसरमधील प्रवाशांना कल्याणीनगर मेट्रो स्थानकांपर्यंत सुकर प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणार्या प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी, तसेच प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) यांच्या समन्वयाने नियोजन करण्यात येत आहे.
हडपसर गाडीतळ-मगरपट्टा ते कल्याणीनगर या मार्गावरील बससेवेचा पीएमपीच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे आणि महामेट्रोचे महाव्यवस्थापक राजेंद्र सनेर-पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. या मार्गावर २८ फेर्या होणार आहेत. यासह दर ४५ मिनिटांनी बस सोडण्याचे निश्चित केले आहे. हडपसर, गाडीतळ, मगरपट्टा दवाखाना, मेगा सिटी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, कीर्तने बाग, मुंढवा गाव, कचरेवस्ती, कल्याणीनगर पूल ते कल्याणीनगर बस स्थानक या मार्गिकेनुसार बस धावणार आहे. महामेट्रोच्या दुसर्या टप्प्यातील विस्तारीकरण प्रकल्पात खराडी ते हडपसर या मार्गिकेला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
हा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. हडपसर, मगरपट्टा या परिसरातील स्थानिकांना स्वारगेट, पिंपरी-चिंचवड किंवा शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या परिसरात जाण्यासाठी पीएमपीवर अवलंबून राहावे लागत आहे. मगरपट्टा परिसरात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्या असल्याने नागरिकांची वर्दळ असते. या परिसरात सतत वाहतूक कोंडी असते. याबाबत स्थानिकांकडून महामेट्रो आणि पीएमपी प्रशासनाकडे मागणी करण्यात येत होती. त्यानुसार हडपसर, मगरपट्टा परिसरातील स्थानिकांसाठी कल्याणीनगर मेट्रो स्थानक जवळ असल्याने या मार्गिकेवर बससेवा सुरू करण्यात आल्याचे पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुंडे यांनी सांगितले.
शहरातील ज्या भागात मेट्रो मार्गिका नाहीत. पण, पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत मेट्रो स्थानक आहे, अशा ठिकाणी पीएमपी आणि महामेट्रोच्या समन्वयाने पूरक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दोन्ही विभागांकडून अशा मार्गांचा अभ्यास करण्यात येत आहे. लवकरच अन्य ठिकाणीही पूरक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी.
Related
Articles
अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर
15 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
अर्जुन तेंडूलकर, अरमान जाफरने बदलला संघ
11 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू
11 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
14 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक